Wednesday, August 14, 2024

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज ;

वेध माझा ऑनलाइन।
 राज्यात जुलै महिन्यात पावसाने थैमान माजवलं होत. राज्यातील प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण या महिन्यात पाऊस अधूनमधून काही भागात हजेरी लावत आहे. त्यामुळे राज्यातून पावसाने काढता पाय घेतला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो.दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात पावसाने मारली दडी :
ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरांसह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस कमी झाल्याचे दिसत आहे. तर, पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील ढगांची गर्दी वगळता इतर भागांमध्ये देखील पावसाने दडी मारली आहे. मात्र आता हवामान खात्याने एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान वाढत आहे. तर कोकण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये देखील पुढील काही दिवसांमध्ये हवेतील आर्द्रता वाढून उकाडा आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईचा देखील पारा वाढतच जाणार आहे. त्यामुळे राज्यात ऊन- सावल्यांचा खेळ सुरु असल्याचं दिसत आहे.

No comments:

Post a Comment