Sunday, August 25, 2024

मविआत जागा वाटपावरून वाद होणार...खुद्द जयंत पाटील यांचा दावा ; काय आहे बातमी?


वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काय-काय घडामोडी घडतात? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मविआची नुकतीच जागा वाटपासाठी बैठक देखील पार पडली. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. कोणत्या पक्षाची कुणासोबत युती होईल, याचा भरोसा नाही. तसेच कोणत्या पक्षाची कुणासोबत काडीमोड होईल, याचाही अंदाज नाही. राज्यातलं राजकारण अनिश्चित असं आहे. कारण गेल्या पाच वर्षांमधील घडामोडी तरी तेच सांगत आल्या आहेत. या घडामोडींनी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा मोठमोठे धक्के दिले आहेत. यानंतर हे धक्के आता पुन्हा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार मविआत जागा वाटपावरुन खटके उडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआत काय-काय घडामोडी घडतात? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. 

जयंत पाटील काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “विधानसभेच्या 288 जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे काही वाद होणं अपेक्षितच आहे. त्यामुळे त्याची चर्चा होणं, त्याबद्दल वाद होणार नाही, असं होणार नाही. पण शेवटी आम्हाला एकत्र राहायचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढू”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment