Monday, August 26, 2024

राज्यातील महायुतीचे दिगग्ज नेते लागले शरद पवारांच्या गळाला?

वेध माझा ऑनलाईन।
राज्यात अवघ्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तयारीला सुरवात केली आहे. अशातच आता राज्यातील अनेक बडे नेते महाविकास आघाडीकडे वळू लागले आहेत. यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रशांत परिचारक यांसह अनेक नेत्यांच्या पडद्याआडून चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे.


राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असलेले अनेक राजकीय नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . यामध्ये अकलूज येथील रणजितसिंह मोहिते पाटील , पंढरपूर येथील प्रशांत परिचारक , इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील , पुण्यातील बापू पठारे, भुईंज येथील मदन भोसले याशिवाय कागल येथील समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पडद्याआडून चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन केलं. कारण लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल असे त्यांना वाटले होते. मात्र त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील महायुतीमध्ये समावेश केला. गेले कित्येक वर्ष कट्टर विरोधक राहिलेल्या नेत्यांची अनेक मतदारसंघात लोकसभेसाठी मोट बांधण्यात होती . पण आता येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती सरकारमधील अनेक दिग्गज नेते पुन्हा महविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहेत असे समजते.

No comments:

Post a Comment