वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित निकाला पाहायला मिळाला, तर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा करिश्मा दिसून आलं. त्यामुळे, लोकसभेला महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार निवडून आले आहेत. या निवडणुकांचा निकाल पाहून शरद पवारांकडे विधानसभा निवडणुकांसाठी अनेक नेतेमंडळी जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, काही नेते शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची भेट घेत आहेत. इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. तर, काही दिवसांपूर्वी परभणीत बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता, अजित पवार यांच्या गटातील आमदाराने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत कारमधून एकत्र प्रवास केला.
सोलापूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, शरद पवारांची या जिल्ह्यावरील पकड आजही कायम आहे. त्यामुळेच, लोकसभा निवडणुकीत ऐनेवळी मोहित पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. माढ्याचे बबन शिंदे आणि मोहोळचे यशवंत माने दोघेही अजित पवारांसमवेत आहेत. मात्र, आज यशवंत माने यांनी सुप्रिया सुळेंसोबत एकत्र प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मोहोळचे आमदार यशवंत माने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत बंडगर यांच्या वडिलांचे काल निधन झाले. त्यांच्या घरी सुप्रिया सुळे सांत्वन भेटीसाठी गेले होत्या. त्यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने देखील तिथेच होते. या सांत्वन भेटीनंतर सुळे आणि आमदार यशवंत माने यांनी भिगवण ते बारामती असा एकाच कारमधून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या गटातील काही आमदार शरद पवारांकडे येण्यास इच्छुक असल्याची चर्चा सातत्याने होत असते. तर, जयंत पाटील व रोहित पवार यांच्याकडून या वृत्तांना दुजोराही दिला जातो. त्यातच, आजही ही भेट ठरवून होती की अचानक झाली, याचीही चर्चा आता होत आहे. कारण, अजितदादांचा आमदार थेट सुप्रियाताईंच्या कारमध्ये बसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.
No comments:
Post a Comment