Thursday, August 15, 2024

विधानसभेसाठी अजितदादा यांचा मोठा डाव ? बारामती मधून जय पवार याना उमेदवारी,तर स्वतः उभे राहणार रोहित पवारांच्या विरोधात?

वेध माझा ऑनलाइन ।
आगामी विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी दिले आहेत. अजितदादांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव जय पवार रिंगणात उतरु शकतात, अशा आशयाचे सूचक वक्तव्य केले. 

बारामतीत जय पवार यांना निवडणुकीला उभे करायचे की नाही, याचा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते आणि संसदीय मंडळ घेईल, असे सांगत अजित पवार यांनी एकप्रकारे बारामती मतदारसंघावरील दावा सोडल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवली नाही तर मग ते दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून लढणार, असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला होता. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असून तो रोहित पवार यांच्यासाठी मोठा शह ठरु शकतो. कारण अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड  मतदारसंघात भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. परंतु, यंदा अजितदादा कर्जत-जामखेडमधून रिंगणात उतरल्यास रोहित पवार यांच्यासमोर प्रचंड मोठे आव्हान उभे राहू शकते.

No comments:

Post a Comment