Friday, August 9, 2024

मनोज जरांगे म्हणाले...छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल, त्याचा उमेदवार पाडायचा,...अजितदादा म्हणाले...नो कॉमेंट्स...!

वेध माझा ऑनलाईन
 मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आणि अन्य काही मागण्यांसाठी लढा उभारलेले मनोज जरांगे-पाटील यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. यासाठी ते राज्यभरात दौरे, शांतता रॅली करत आहेत. सोलापूरमध्ये बोलताना मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं. 

छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल, त्याचा उमेदवार पाडायचा, असं विधान मनोज जरांगेंनी शांतता रॅलीत केलं होतं. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. यावर अजित पवारांनी 'नो कमेंट्स...', असं एका वृत्त वाहिनीशी बोलताना उत्तर दिलंय 

No comments:

Post a Comment