वेध माझा ऑनलाईन।
प्रेमासाठी वाट्टेल ते अशी भूमिका घेऊन प्रेमवीर कुठे-कुठे जातात. काहीजण जीवाची बाजी लावून पाकिस्तानध्येही गेल्याच्या घटना घडल्यात. आपलं घर सोडून प्रेमाखातर राज्यांच्या सीमा ओलांडून जाणाऱ्यांना त्यांचं प्रेम मिळालं तर ठिक, नाहीतर सगळ्यावर पाणी फेरलं जातं. असाच काहीसा प्रकार रत्नागिरीत घडला आहे. इन्स्टाग्रामवरून ओळख झाली आणि नंतर प्रेमही झालं, मग ती युवती पंजाबहून थेट रत्नागिरीत आली. पण रत्नागिरीत आल्यानंतर मात्र प्रियकर नॉट रिचेबल झाला.
इन्स्टाग्रामवरून झाली ओळख
वर्षभरापूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या प्रेमातून पंजाबमधील मोहालीच्या तरूणीनं थेट रत्नागिरी गाठली. पण रत्नागिरीमध्ये येताच आपली फसवणूक झाल्याची बाब या तरूणीच्या लक्षात आली. दोनच दिवसांपूर्वी झालेला संपूर्ण प्रकार तरूणीनं प्रसारमाध्यामांसमोर येत उघड केला आहे.
प्रियकर गायब
पंजाबहून रत्नागिरीला आलेली तरूणी संबंधित तरूणाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरून फोन करत होती. सोशल मीडियावर त्याला मेसेज करत होती. पण त्याचा रिप्लाय मिळत नव्हता. शिवाय उचलला गेलेला फोन कुण्या भलत्याच तरूणीनं उचलल्याचा दावादेखील या तरूणीनं केला आहे
एका दुकानदारामुळे तरूणी सुखरूप
आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर कुठंतरी नोकरी शोधून पैसे कमवायचे आणि घरी परत जायचं या इराद्यानं तरूणीनं नोकरीचा शोध सुरू केला. पण त्याचवेळी एका मोबाईल दुकानातील दुकानदारानं या तरूणीची सारी चौकशी केली. त्यानंतर सगळा प्रकार समोर आला.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरूणीच्या घरच्यांशी संपर्क केला. दरम्यान तरूणी तिच्या पंजाबमधील मोहाली येथील गावी परतली आहे. तर तरूणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याबाबतचा शोध देखील सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
No comments:
Post a Comment