वेध माझा ऑनलाइन।
राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीचे सरकार आहे. तिन्ही नेत्यांमध्ये योग्य समन्वय आहे तसेच कोणत्याही कार्यक्रमाला तिन्ही नेत्याची एकत्रित हजेरीही महाराष्ट्राचे अनेकदा बघितली आहे. त्यामुळे सरकार मध्ये सगळं काही ओके वातावरण आहे. मात्र याच महायुतीला तडे जातायत कि काय अशी घटना पुण्यात घडली आहे. अजित पवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच काळे झेंडे दाखवण्यात आलेत. जुन्नरमध्ये हि घटना घडली आहे
अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरु केली आहे. आज पुण्यातील जुन्नर भागात ही जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. मात्र भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. अजित पवारांचा ताफा ज्या ठिकाणावरुन बैठकींचं आयोजन करण्यात आलेल्या सभागृहात जात होता त्याच मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केले. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलून पालकत्वाची भूमिका पाळली नाही असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील या घटनेने महायुतीत खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment