वेध माझा ऑनलाइन।
लाडकी बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. कोणाचा बाप आला तरी योजना बंद होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर दुसरीकडे जमिनीच्या मोबदल्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं लाडकी बहीण योजनेवरुन इशारा दिला आहे. पुण्यातल्या जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टानं शिंदे सरकारला धारेवर धरलंय. मोफत वीज, लाडकी बहीण योजनेला वाटायला पैसे आहेत मग जमिनीचा मोबदला देण्यासाठी का नाही ? असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला आहे.
‘अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवू’
बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढा, मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं. याचिकाकर्ते टी एन गोदाबर्मन यांच्या पूर्वजांनी 1950साली 24 एकर जमीन घेतली होती. राज्य सरकारनं ही जमीन घेतली परंतू मोबदला न मिळाल्यानं याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय घ्या नाही तर लाडकी बहीण योजना थांबवू असं सुप्रीम कोर्टानं फटकारलं आहे.
This comment has been removed by the author.
ReplyDelete