वेध माझा ऑनलाइन। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. मात्र, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील तेरा कोटी लोकांची जाहीर माफी मागतो. यातील सर्व दोषी लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे म्हणत अजित पवार यांनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागितली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेदरम्यान लातूरच्या सभेवेळी गोंधळ झाला. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना स्टेजवर काही मराठा आंदोलक आले आणि त्यांनी अजित यांना भूमिका स्पष्ट करायला सांगितलं. हिंगोलीच्या वसमतच्या सभेवेळी हा प्रकार घडला. अजित पवार बोलत असताना काही मराठा कार्यकर्तांनी गोंधळ केला. अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणांवरुन महिलावर्गात चांगलाच रोष आहे. लातूरात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली. अजित पवारांच्या भाषणावेळी एका महिलेने भर सभेत उठून 'दादा महिलांना सुरक्षा द्या' अशी मागणी केली.
No comments:
Post a Comment