Wednesday, August 14, 2024

नितेश राणे यांचा पोलिसांना इशारा ; म्हणाले... लोकांशी सरळ बोला, नाहितर ...क़ाय आहे बातमी ?


वेध माझा ऑनलाइन।
कराड तालुक्यातील आगाशिवनगरात दोन समाजातील व्यावसायिकांमध्ये मारहाण झाल्याची घटना सोमवार, दि.१२ रोजी रात्री घडली होती. या घटनेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मारहाण झालेल्या संबंधित पवार कुटुंबांची भेट घेतली. गुन्हा नोंद करायला गेलेल्या पवार कुटुंबांला पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे समजताच राणेंनी आक्रमक पावित्रा घेत पोलिसांना धारेवर धरले. 

“एखाद्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपूर्ण पोलिस खात्याची बदनाम होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. यापुढे आम्ही निवेदन मागण्या करत बसणार नाही, थेट घुसण्याची तयारी ठेवली आहे,” असा राणे यांनी इशारा दिला.

No comments:

Post a Comment