राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडक़ी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने आता पैसे खात्यावर जमा करायला सुरुवात केली आहे कराडच्या वार्ड क्रमांक तीन मधील भगिनीना या योजनेचे पैसे मिळालेबद्दल त्या सर्व भगिनीनी त्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार (आप्पा) यांना राखी बांधून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत;
प्रवीण पवार यानी त्या भागातील असंख्य महिलांचे या योजनेसाठी फॉर्म भरून घेवून आवश्यक ती पूर्तता करून घेतली होती तसेच त्याकरीता असणाऱ्या तांत्रिक बाबी पूर्ण करून घेण्यासाठी देखील प्रयत्न केले होते त्यामुळे तेथील महिलांनी श्री पवार यांचे आभार मानले आहेत बहुसंख्य महिलांना त्याठिकानी या योजने अंतर्गत हा लाभ मिळतो आहे
श्री पवार यांनी त्या परिसरातील 721 महिलांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले होते आणि ते सर्व अर्ज वैध झाले आहेत त्यासाठी त्यांनी गेले दीड महिना कॅम्प भरवला आहे आणि अजून पंधरा दिवस हा कॅम्प चालूच राहणार आहे तरी अजुन ज्या महिलांना अर्ज भरावयाचे असतील त्या सर्व महिलांनी ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा असे आवाहनही श्री पवार यांनी केले आहे
श्री प्रवीण पवार यानी वार्ड क्रमांक 3 या परिसरात आपल्या सामाजिक कार्याने आपला वेगळा ठसा उमटवून तेथील जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे त्यानिमित्ताने त्यांचे नेहमीच कौतुक होत असते
मागील पावसाळ्यात त्यानी त्याच परिसरात स्वतः च्या खिशातिल पैसे खर्च करून त्याठिकानचा खराब झालेल्या रस्त्याला चकाचक बनवले होते त्याची आजही चर्चा होत असते त्यांचा शहरातील अनेक सार्वजनिक कार्यात भरभरून सहभाग नेहमी दिसतो शासनाच्या लाडकी बहिन योजनेचा प्रभाग 3 मधील अनेक महिलांना लाभ होण्यासाठी देखील त्यांनी अथक प्रयत्न केले त्याचमुळे त्या परिसरातील महिलांनी खात्यावर पैसे जमा होताच श्री पवार यांचे आभार मानले आहेत
No comments:
Post a Comment