राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. ते लवकरच भाजपत जाणार असल्याचं वारंवार बोललं जातं. आता पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या नाराजीवर भाष्य करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर कोणीही कुठेही जाऊ शकतं. आमच्या गटात किती जण येतात तेही लवकरच कळेल. जयंत पाटील हे शरद पवार गटात अस्वस्थ आहेत. रोहित पवार वारंवार त्यांचा अपमान करतात. कदाचित ते भाजपच्या वाटेवर आहेत, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माध्यम समूहाशी बोलताना म्हणाले आहेंत
Big Breaking
No comments:
Post a Comment