महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी कॉँग्रेस नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या.दिल्लीत झालेल्या या भेटीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि रणनीतीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची देखील भेट घेतली आहे. या भेटीनंतर राज्यात आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार, अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत.
त्यातच उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत मोठं भाष्य केलं आहे. “आमचा उद्देश हा महाराष्ट्राला लुटणाऱ्याला पराभूत करणे हाच आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेता येईलच. मी मुख्यमंत्री असताना चांगले काम केले असेल तर मविआतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment