वेध माझा ऑनलाइन।
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी? होणार याबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आलं. यावर आयुक्तांनी उत्तर दिलंय.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत राजीव कुमार यांना दोनवेळा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना राजीव कुमार यांनी म्हटलं की, महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर असून महाराष्ट्राची 26 नोव्हेंबर आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील विधानसभेची निवडणूक 2019 मध्ये सोबत जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक आयोगासमोर जम्मू काश्मीच्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकांचा विषय निवडणूक आयोगासमोर होता.
महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आयोजित करायची आहे. सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त याचा विचार करता हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक सोबत जाहीर करत आहोत.
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता तिथं पाऊस झाला होता त्यामुळं बीएलओची कामं पूर्ण झालेली नाहीत. अनेक सण आहेत हा देखील मुद्दा असून गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत जाहीर करण्याचा निर्णय घेतला, असं राजीव कुमार म्हणाले.
No comments:
Post a Comment