गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. यामध्ये आज भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांचाही समावेश झाला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी मदन पाटील यांची भेट घेतली या भेटीत जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्यासमोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडला असावा, अशी शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जयंत पाटील हे मदन पाटील यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र, त्यांनी भेटीबाबत काही बोलण्यास नकार दिला. आता मदन भोसले भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गोटात दाखल होणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत, अशी मोघम प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला.
No comments:
Post a Comment