नुकतेच हौसाई विद्यालय, मलकापूर येथे लायन्स क्लब ऑफ कराड शहरच्या वतीने विद्यालयातील होतकरू व गरजू विद्यार्थिनींना ड्रेस वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन मंजिरी कुस्पे, सचिव लायन शशिकांत पाटील, लायन सोफिया कागदी, लायन सुनीता पाटील, लायन मीना कोलते, लायन स्मिता कदम, लायन राजकुमार बाबर आदि मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील सुमारे वीस विद्यार्थी विद्यार्थिनींना ड्रेसचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना कोटा अकॅडमीच्या प्राचार्य तसेच लायन्स क्लबच्या अध्यक्षा मंजिरी खुस्पे म्हणाल्या या विद्यालयातील विद्यार्थिनी अतिशय संस्कारी, अभ्यासू आहेत. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यावर मात करण्यासाठी कोटा अकॅडमीच्या माध्यमातून निश्चितपणाने सर्व मदत केली जाईल. तसेच विद्यालयातील गरीब व होतकरू असणाऱ्या दोन विद्यार्थिनींना दत्तक घेणार असल्याचेही त्यानी यावेळी जाहीर केले. तसेच लायन्स क्लब कराडच्या वतीने विद्यार्थिनींचे आरोग्य याविषयीचा एक परिसंवाद विद्यालयात आयोजित केला जाईल असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश वेदपाठक, कल्याण कुलकर्णी, बालाजी मुंडे, पद्मावती पाटील, अंजना जानुगडे, वीरभद्र खुरपे, धनाजी पाटील, किरण कुंभार, विकास शिंगाडे तसेच विद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment