Monday, August 19, 2024

नवाब मलिक आणि अजित पवार दिसले एकाच मंचावर; महायुतीत ठिणगी पडणार?

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार आणि नवाब मलिक आज मुंबईत एका कार्यक्रमात एकाच मंचावर आलेले बघायला मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी महायुतीत ठिणगी पडते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांचा नवाब मलिक यांना टोकाचा विरोध आहे. फडणवीस यांनी याआधीच अजित पवारांना याबाबत पत्र पाठवलं आहे. तसेच त्यांनी आतादेखील तशीच भूमिका मांडली आहे.

राज्याचे माजी अल्पसंख्याक मंत्री तथा आमदार नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवत नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याबाबत विरोध दर्शवला होता. त्यानंतर अजित पवार आणि नवाब मलिक यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला. तसेच हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या कारणास्तव महायुतीत आता ठिकणी पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली. अजित पवार या सभेला पोहोचण्याआधी नवाब मलिक यांच्याकडून अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर नवाब मलिक आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून प्रवासही केला. दरम्यान, नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे. नवाब मलिक यांच्याबाबत माझी भूमिका ठाम असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


No comments:

Post a Comment