वेध माझा ऑनलाइन।
बारामती लोकसभा निवडणूक २०२४ कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कारण पवार कुटुंबियामधील ही लढत होती. नणंद-भावजय अशी ही लढत झाली. या लढतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. त्यानंतर आता बारामती विधानसभा निवडणुकीत लढत कशी रंगणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. आपणास आता निवडणूक लढवण्यात रस राहिला नाही. जय पवार याच्या उमेदवारीबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी म्हटले.
काय म्हणाले अजित पवार
जय पवार यांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले की, आमच्या भागातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे. मी सात, आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला आता रस राहिला नाही. जय पवार यांच्याबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल. अजित पवार यांच्या या निर्णयावर पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. तसेच जय पवार यांच्या उमेदवारीबाबत मी आता अजित पवार यांना भेटणार आहे. त्यावेळी चर्चा करणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत दादावर कुठलाही दबाव नव्हता, पार्लमेन्ट्री बोर्डाने तसा निर्णय घेतला होता, असे तटकरे यांनी म्हटले.
No comments:
Post a Comment