वेध माझा ऑनलाईन ।
महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना आणली आहे. आगामी 17 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हफ्ते जमा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला, म्हणजे दिला आणि शब्द दिल्यावर मी शांत बसत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काल ठाण्यात आदिवाशी दिनानिमित्त एकनाथ शिंदेंनी आदिवासी पाड्यात जाऊन संवाद साधला.
एकनाथ शिंदेंनी यावेळी विराधकांवर देखील निशाना साधला. लाडकी बहिण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. ते म्हणताय ही योजना होणारच नाही. त्यामुळे या लाडक्या भावांपासून सावधान राहा...लाडकी बहीण योजना कायम राहणार आहे. जेव्हापासून आम्ही योजना राबवली तेव्हापासूनच त्यांना पोटदुखी झाली. ज्या-ज्या ठिकाणी मी दौऱ्याला जातो, त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी आता माझं स्वागत करून ओवाळून मला राखी देखील बांधतात. त्याला देखील नशीब लागतं. माझी एकच सख्खी बहिण होती आता महाराष्ट्रातील लाखो बहीणी आहेत, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
सावत्र भाऊ संभ्रम निर्माण करत आहे- मुख्यमंत्री
सध्या लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय झाली असून या योजनेचे लाभ तुम्हाला मिळू नयेत यासाठी अनेक सावत्र भाऊ संभ्रम निर्माण करत आहेत, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे आणि तुमच्या सख्या भावावर विश्वास ठेवावा असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. जात-पात न पाहता सर्व समाजातील माता भगिनींना आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देत आहोत, असंही एकनाथ शिंगे म्हणाले.
No comments:
Post a Comment