वेध माझा ऑनलाइन। गेल्या वर्षात सरकारचे धोरण बदलल्यामुळे विस्कळीतपणा आला आत्ताच्या घडीला डिसेंबरमध्ये तयार केलेले इथेनॉल पडून आहे. मात्र, इथेनाॅल आणि साखरेला कायम महत्व राहणार आहे. साखर, इथेनाॅल, वीज यासह उपपदार्थांचे उत्पादन कारखान्यांनी घेतले पाहिजे. ऊसासारख स्थिर उत्पादन देणारा कोणताही व्यवसाय नाही. त्यामुळे साखर कारखानदारीला नेहमी महत्त्व राहणार आहे, ही इंडस्ट्री कधीही खाली जाणार नाही. असे मत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ. सुरेश भोसले यांनी आज वार्षिक सभेत व्यक्त केले
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेला कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मोहनराव कदम, माजी आमदार भगवानराव साळुंखे, तसेच कृष्णा कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतुल भोसले म्हणाले, कृश्णा ने 137 दिवसांमध्ये साडेतेरा लाख टन गाळप सरासरी 10 हजार मेट्रिक टन करून दाखवलं. कार्यक्षमतेच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवण्याचं काम हे कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी मागच्या गळीत हंगामामध्ये दाखवलं.आपण 3100 रूपये दर दिला आणि 266 रुपये आपण टनाला जास्तीचा दर दिला. मोफत साखर, घरपोच साखर देण्याचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या कारखान्याला करावा लागत आहे. तो खर्च देखील हा कारखान्याच्या ताळेबंदावरच पडतो असेही डाॅ. अतुल भोसले म्हणाले
इंडियन ऑइल कंपनीची 120 कोटीची गुंतवणूक होणार :
राष्ट्रीयकृत इंडियन ऑइल कम्पनी ही आपल्या सोबत भागीदारीस तयार आहे. ही कंपनी कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये बायो सीएनजींच्या प्रकल्पासाठी गुंतवणूक करू इच्छिते त्यांचे प्रेझेंटेशन देखील दिले गेले आहे. त्या कंपनीसोबत सुरेश बाबांची यशस्वी चर्चा झाली आहे 120 कोटी रुपयांची गुंतवणूक ही कम्पनी कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये करणार आहे. या गुतवणुंकीमुळे एक नवीन प्रकल्प उभा राहणार असल्याचेही डाॅ. अतुल भोसले यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment