बदलापूर येथील बालिकांवर झालेला अत्याचार व राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्यावतीने, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, कराड तालुका व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला, गुन्हेगारांना तातडीने कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान आमदार बाळासाहेबांच्या या आंदोलनात कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, कराड नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक तसेच पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान येथील दत्त चौकात काँग्रेस व उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनीदेखील हेच आंदोलन केले यावेळी राज्यसरकार आणि गृहखात्याविरोधात घोषणा देण्यात आल्या त्यानंतर प्रांतांना निवेदन देण्यात आले काँग्रेस नेते ऍड उदय पाटील शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तसेच रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
मात्र काल या आंदोलनाची घोषणा करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आ बाळासाहेब पाटील आ पृथ्वीराज चव्हाण तसेच ऍड उदय पाटील यांच्या प्रतिनिधींसह शिवसेनेचे पदाधिकारी आघाडी म्हणून उपस्थित दिसले मात्र आज प्रत्यक्ष आंदोलन करण्यात आले त्यावेळी आ बाळासाहेब पाटील गटाने स्वतन्त्र पणे हे आंदोलन केले तर आ पृथ्वीराज चव्हाण गट तसेच उदय पाटील व शिवसेनेने एकत्र येऊन हे आंदोलन केले ...असे अचानकपणे का घडलं?...अशी आता गावात चर्चा सुरू आहे...
No comments:
Post a Comment