Wednesday, October 5, 2022

सातारा पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे याना मारहाण झाल्याची तक्रार ; भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल...

वेध माझा ऑनलाइन - सातारा नगरपालिकेच्या माजी महिला उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे यांना भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी दमदाटी करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. दसऱ्याच्या दिवशीच घडलेल्या या प्रकाराने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारानंतर जांभळे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, साताऱ्यातील कला वाणिज्य महाविद्यालयाजवळ नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी बुधवारी सकाळी रांगोळी काढत होत्या. यावेळी एका माजी उपनगराध्यक्षांचे पती घटनास्थळी आले. त्यांनी रांगोळी का काढत आहात, स्वच्छतेचे काम करा असे महिला कर्मचाऱ्यांना सांगितले.
यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भाजप नगरसेवक धनंजय जांभळे यांचा पारा चढला आणि त्यांनी अरेरावी सुरू केली. काही वेळात संबंधित माजी महिला उपनगराध्यक्षांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र जांभळे यांनी अरेरावी सुरूच ठेवली. यानंतर त्यांनी दमदाटी करत मारहाण केली, असा आरोप माजी महिला उपनगराध्यक्षांनी केला आहे. या घटनेनंतर संबंधित दिपाली गोडसे दांपत्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन धनंजय जांभळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे

Tuesday, October 4, 2022

फक्त 300 रुपये लाच घेताना अटक ; विद्युत निरीक्षणचा कनिष्ठ लिपिक अडकला जाळ्यात ; लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने केली कारवाई ;

वेध माझा ऑनलाइन - तीनशे रुपयांची लाच स्वीकारणारा विद्युत निरीक्षणचा कनिष्ठ लिपिक आज एसीबीच्या जाळ्यात अडकला त्याला तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायरमन ट्रेड मधून शिक्षण झालेल्या तक्रारदाराला तारतंत्री प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विद्युत निरीक्षण कार्यालय सातारा येथील कनिष्ठ लिपिक महेश सागर शिवशरण याने तक्रारदाराला चारशे रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती तीनशे रुपये लाच देण्याचे ठरले याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस नाईक विनोद राजे संभाजी काटकर तुषार भोसले व पथकाने सापळा रचून महेश शिवशरण यांना तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले 
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस नाईक विनोद राजे संभाजी काटकर तुषार भोसले व पथकाने केली

दोन दसरा मेळावे ; पोलिसांनी कम्बर कसली ; नागरे-पाटील मैदानात...

वेध माझा ऑनलाइन - दसरा मेळाव्याआधी मुंबईतलं राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे, यावेळी पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वांद्र्याच्या बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांसाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यायला सुरूवात झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊ नये, यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे.
मुंबईमध्ये या दोन दसरा मेळाव्याशिवाय देवीचं विसर्जनही होणार आहे, त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मध्ये पोलिसांनी चेन सिस्टीममध्ये बंदोबस्त केला आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये समनव्य राहावा, यासाठी डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचा व्हॉट्सऍप ग्रुपही बनवण्यात आला आहे.

प्रत्येक डीसीपीच्या अखत्यारीत 4 एसीपी असतील, या एसीपींना 10-12 पोलिसांची टीम रिपोर्ट करेल. मुंबईत ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सुरक्षा स्टेशनही बनवण्यात आली आहेत
दोन्ही दसरा मेळावे आणि नवरात्र विसर्जनासाठी मुंबईत 3,200 ऑफिसर, 15,200 पोलीस, 1,500 एसआरपीएफचे जवान, 1,000 होमगार्ड, 20 क्युआरटी टीम आणि 15 बीडीडीएस टीमचा समावेश आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांआधी मुंबईच्या कायदा-सुव्यवस्थेचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेची पाहणी केली.

कृष्णा हॉस्पिटल परिसरात भीषण आग ; लाखोंचे नुकसान..!


वेध माझा ऑनलाइन - 
 कृष्णा हाॅस्पीटल समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील तीन दुकानांला आज मंगळवारी  दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. 

 कृष्णा हाॅस्पीटल समोर आज दुपारी मंगळवारमुळे बंद असलेल्या दुकानातून धूर येवू लागला होता. याबाबतची माहीती काही नागरिकांनी कराड नगरपालिका आणि कृष्णा हाॅस्पीटलच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलच्या समोरील बाजूस कृष्णा हॉस्पिटलचे मुख्य गेट ते ढेबेवाडी फाटा दरम्यान सेवा रस्त्यालगत अनेक व्यवसायिकांची दुकाने एकमेकांना लागून आहेत. यामध्ये स्टेशनरी, ज्यूस विक्री, हॉटेल, फळे विक्री यासह छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा समावेश आहे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. त्यामुळे व्यावसायिकांसह परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या आगीने काही क्षणातच बाजूच्या अनेक दुकानांना वेढा दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली अग्निशामक दलाच्या तत्परतेने आग विझविण्यात यश आले, 

पत्रकार महेश सूर्यवंशी याना राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर ; गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी होणार वितरण...

वेध माझा ऑनलाइन - विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी धोंडेवाडी (ता.कराड) येथील आईसाहेब शालन शेडगे फाउंडेशनच्यावतीने आदर्श माता पुरस्कार व राज्यस्तरीय विशेष पुरस्कार देण्यात येतो. यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार मान्यवरांना आदर्श माता पुरस्कार व चार राज्यस्तरीय विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानदेव शेडगे यांनी दिली.दरम्यान, पत्रकार महेश भानुदास सुर्यवंशी यांना या संस्थेने पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला आहे

   धोंडेवाडी येथील आईसाहेब शालन शेडगे फाउंडेशनच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. विशेषतः विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर गुणात्मकता वाढावी यासाठी फाउंडेशनच्यावतीने विशेष भर दिला जातो.तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठीही फाउंडेशन मोलाचे योगदान देत आहे. फाउंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी आदर्श माता पुरस्कार व राज्यस्तरीय विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी मंगला सुभाष ढगे (उंब्रज), शालन रघुनाथ खबाले (विंग), सुमन शंकर यादव (कालेटेक), शोभाताई अरुण चव्हाण(कोळे) यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर प्रा.विजय महादेव लिगाडे( विद्यानगर-कराड), प्रा.बाजीराव मारुती पाटील( विद्यानगर-कराड) यांना राज्यस्तरीय विशेष शैक्षणिक पुरस्कार, महेश भानुदास सुर्यवंशी (कराड) यांना राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार तर डॉ.सौ. प्रियदर्शनी विक्रम शिंदे( कासार शिरंबे) यांना राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून गुरुवार दि.6 ऑक्टोबर रोजी धोंडेवाडी येथे शानदार समारंभात  मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे ज्ञानदेव शेडगे यांनी सांगितले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर ; तरीही त्यांची तुरुंगातून सुटका नाही ; वाचा ब्रेकिंग...

वेध माझा ऑनलाईन - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा जामीन मंजूर झाला असला तरी त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. कारण सीबीआयकडूनही त्यांच्यावर वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावर निर्णय होणं बाकी आहे.  

मनी लॉंड्रिंग आणि 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडीने आणि सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये ईडीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने अनेकदा न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. पण प्रत्येकवेळी तो नाकारण्यात आला. आता तब्बल 11 महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 


Monday, October 3, 2022

येरवळे येथे विधवा माता-भगिनींचा हळदी,कुंकू,ओटी देऊन सन्मान ;

वेध माझा ऑनलाइन - प्रेरणा महिला ग्राम संघ यांच्यावतीने येरवळे  येथे विधवा प्रथा बंदी या सरकारी कायद्यानुसार विधवा माता-भगिनींचा हळदी कुंकू आणि ओटी देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुवर्णा देसाई म्हणाल्या, कायद्याने दिलेल्या या अधिकाराचे सर्वांनी स्वागत करून आशा माता-भगिनींना त्यांचा अधिकार मिळाल्याबद्दल उत्साहाने पाठिंबा द्यायला हवा 
 ग्रामपंचायत सदस्य आणि प्रेरणा ग्रामसंघाच्या कोषाध्यक्ष कविता यादव म्हणाल्या, हजारो लोकांच्या साक्षीने आणि देवा ब्राह्मणांच्या आशीर्वादाने त्या महिलेने आपल्या नावापुढे आजन्म पतीचे नाव जोडून घेतले आहे. तर त्याच नावासाठी आजन्म हळदी कुंकू लावणं हा तिचा अधिकारच आहे.
हिरकणी बचत गट अध्यक्ष शामल यादव म्हणाल्या, आजच्या या कार्यक्रमाला वृद्ध महिला काठी टेकत पाठिंबा देण्यासाठी आल्या त्याचा आम्हाला खुप अभिमान आहे.

कार्यक्रमाला वैयजंता पवार, गोकुळा यादव, यशोदा यादव, उमा यादव, सुशीला लोकरे, शोभाताई चव्हाण, अनिता पानसकर, कांबळे मावशी, कविता यादव, संगीता थोरात, राधा देसाई, विमल थोरात, कुसुम यादव, इंदुबाई पवार, पद्मावती यादव, यशोदा पोळ, प्रेरणा महिला ग्राम संघाच्या सदस्य कल्पना यादव, संगीता यादव, मेघा यादव, शुभांगी पानसकर, साधना थोरात, लक्ष्मी लोकरे,  सुमन लोकरे, अरुणा देसाई उपस्थित होत्या. यावेळी प्रेरणा महिला ग्राम संघाच्या सचिव सुजाता देसाई आभार मानले.