वेध माझा ऑनलाईन - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा जामीन मंजूर झाला असला तरी त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. कारण सीबीआयकडूनही त्यांच्यावर वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावर निर्णय होणं बाकी आहे.
मनी लॉंड्रिंग आणि 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडीने आणि सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये ईडीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने अनेकदा न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. पण प्रत्येकवेळी तो नाकारण्यात आला. आता तब्बल 11 महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment