वेध माझा ऑनलाइन - तीनशे रुपयांची लाच स्वीकारणारा विद्युत निरीक्षणचा कनिष्ठ लिपिक आज एसीबीच्या जाळ्यात अडकला त्याला तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायरमन ट्रेड मधून शिक्षण झालेल्या तक्रारदाराला तारतंत्री प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विद्युत निरीक्षण कार्यालय सातारा येथील कनिष्ठ लिपिक महेश सागर शिवशरण याने तक्रारदाराला चारशे रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती तीनशे रुपये लाच देण्याचे ठरले याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस नाईक विनोद राजे संभाजी काटकर तुषार भोसले व पथकाने सापळा रचून महेश शिवशरण यांना तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत पोलीस नाईक विनोद राजे संभाजी काटकर तुषार भोसले व पथकाने केली
No comments:
Post a Comment