Monday, October 3, 2022

येरवळे येथे विधवा माता-भगिनींचा हळदी,कुंकू,ओटी देऊन सन्मान ;

वेध माझा ऑनलाइन - प्रेरणा महिला ग्राम संघ यांच्यावतीने येरवळे  येथे विधवा प्रथा बंदी या सरकारी कायद्यानुसार विधवा माता-भगिनींचा हळदी कुंकू आणि ओटी देऊन सन्मान करण्यात आला. 

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुवर्णा देसाई म्हणाल्या, कायद्याने दिलेल्या या अधिकाराचे सर्वांनी स्वागत करून आशा माता-भगिनींना त्यांचा अधिकार मिळाल्याबद्दल उत्साहाने पाठिंबा द्यायला हवा 
 ग्रामपंचायत सदस्य आणि प्रेरणा ग्रामसंघाच्या कोषाध्यक्ष कविता यादव म्हणाल्या, हजारो लोकांच्या साक्षीने आणि देवा ब्राह्मणांच्या आशीर्वादाने त्या महिलेने आपल्या नावापुढे आजन्म पतीचे नाव जोडून घेतले आहे. तर त्याच नावासाठी आजन्म हळदी कुंकू लावणं हा तिचा अधिकारच आहे.
हिरकणी बचत गट अध्यक्ष शामल यादव म्हणाल्या, आजच्या या कार्यक्रमाला वृद्ध महिला काठी टेकत पाठिंबा देण्यासाठी आल्या त्याचा आम्हाला खुप अभिमान आहे.

कार्यक्रमाला वैयजंता पवार, गोकुळा यादव, यशोदा यादव, उमा यादव, सुशीला लोकरे, शोभाताई चव्हाण, अनिता पानसकर, कांबळे मावशी, कविता यादव, संगीता थोरात, राधा देसाई, विमल थोरात, कुसुम यादव, इंदुबाई पवार, पद्मावती यादव, यशोदा पोळ, प्रेरणा महिला ग्राम संघाच्या सदस्य कल्पना यादव, संगीता यादव, मेघा यादव, शुभांगी पानसकर, साधना थोरात, लक्ष्मी लोकरे,  सुमन लोकरे, अरुणा देसाई उपस्थित होत्या. यावेळी प्रेरणा महिला ग्राम संघाच्या सचिव सुजाता देसाई आभार मानले.

No comments:

Post a Comment