Tuesday, October 4, 2022

कृष्णा हॉस्पिटल परिसरात भीषण आग ; लाखोंचे नुकसान..!


वेध माझा ऑनलाइन - 
 कृष्णा हाॅस्पीटल समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील तीन दुकानांला आज मंगळवारी  दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. 

 कृष्णा हाॅस्पीटल समोर आज दुपारी मंगळवारमुळे बंद असलेल्या दुकानातून धूर येवू लागला होता. याबाबतची माहीती काही नागरिकांनी कराड नगरपालिका आणि कृष्णा हाॅस्पीटलच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलच्या समोरील बाजूस कृष्णा हॉस्पिटलचे मुख्य गेट ते ढेबेवाडी फाटा दरम्यान सेवा रस्त्यालगत अनेक व्यवसायिकांची दुकाने एकमेकांना लागून आहेत. यामध्ये स्टेशनरी, ज्यूस विक्री, हॉटेल, फळे विक्री यासह छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा समावेश आहे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. त्यामुळे व्यावसायिकांसह परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या आगीने काही क्षणातच बाजूच्या अनेक दुकानांना वेढा दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली अग्निशामक दलाच्या तत्परतेने आग विझविण्यात यश आले, 

No comments:

Post a Comment