वेध माझा ऑनलाईन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव व मनसे नेते अमित ठाकरे हे उद्या सोमवारी कराड नजीक असणाऱ्या विद्यानगर येथे मनसे विद्यार्थी सेनेच्या नव्याने झालेल्या शाखेचे उदघाटन करण्याकरिता येणार आहेत सकाळच्या सुमारास या शाखेचे उदघाटन संपन्न होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे युवकांचे आयडॉल समजले जातात ते मनसे विदयार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांचे पक्ष विस्ताराचे काम संपर्क अभियाना अंतर्गत संपूर्ण राज्यभर चालूच असते सातारा जिल्ह्यात राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे विदयार्थी सेनेचे सामाजिक काम कराड तसेच संपूर्ण जिल्ह्यात सुरू असते कराड नजीक विद्यानगर येथे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे नूतन शाखेचा उदघाटन सोहळा उद्या सम्पन्न होतोय स्वतः अमित ठाकरे या शाखेच्या उदघाटनासाठी उपस्थित राहणार आहेत
दरम्यान, अमित ठाकरे आज रात्री कराड येथील विश्रामगृह येथे मुक्कामास असतील उद्या सकाळी मनसैनिकांबरोबर विश्राम गृहापासून स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी कार्यकर्त्यांसह रॅली ने सकाळी 10 वाजता जाणार आहेत चव्हाण साहेबांच्या समाधीला त्याठिकाणी ते अभिवादन करणार आहेत त्यानंतर 11 वाजता विद्यानगर येथे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे ते उदघाटन करतील त्यानंतर ते कराडच्या विश्रामगृह येथे 1130 पासून येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत सुमारे दुपारी 3 च्या सुमारास कराडच्या पत्रकारांशी ते संवाद साधतील असे मनसेचे जिल्हाध्यक्ष विकास पवार शहराध्यक्ष सागर बर्गे व मनविसेचे शहराध्यक्ष विनायक भोसले यांनी सांगितले
No comments:
Post a Comment