Wednesday, January 11, 2023

उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार ; ठाकरेंसमोरचा पेच वाढणार ;

वेध माझा ऑनलाइन - उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार, आता पुढे काय? ठाकरे गटाचे नेते म्हणाले…शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्ष कोणाचा असा वाद निर्माण झाला. मात्र, हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात असतानाच ठाकरे गटासमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्ष कोणाचा असा वाद निर्माण झाला. मात्र, हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात असतानाच ठाकरे गटासमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार आहे. २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांचा पक्षप्रमुखपदी निवड झाली होती. आता २३ जानेवारीला त्याला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली.अनिल देसाई म्हणाले, “आमच्या वकिलांनी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपण्याआधी पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. जर आयोगाला पक्षांतर्गत निवडणुका घेण्यावर काही आक्षेप असेल, तर त्यांनी निर्णय होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत वाढवावी,” अशीही मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment