वेध माझा ऑनलाइन - आज सोमवार दिनांक 23 रोजी कराड तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद,गोहत्या, धर्मांतरण विरोधी कायदा लागू करण्यात यावा या मागणीसाठी कराड शहरातून हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे सदर मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे या मोर्चात सहभागी होण्यासाठी पंढरीचा मारुती चौकात आज सकाळी 10 वाजता एकत्रित जमावे असे आवाहन करण्यात आले आहे सदर मोर्चा पंढरीचा मारुती, चावडी चौक मार्गे दत्त चौक येथे जाणार आहे
याबाबत सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की हिंदू मुलींना प्रेम संबंधात फसवून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जात आहे मुलींची हत्याही करण्यात येत आहे महिला वर्गात याविषयी मोठी असुरक्षितता आहे लव्ह जिहाद धर्मांतरण याबरोबरच गोहत्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच आहे यामुळे हिंदू समाजाची संस्कृती व अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे सरकारने याविषयी कडक कायदा करणे गरजेचे आहे याच मागणीसाठी आज कराडात हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment