Wednesday, January 11, 2023

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार हे नियमबाह्य सरकार - आ बाळासाहेब पाटील यांचा घणाघात ; शिंदे-फडणवीस सरकारवर केली चौफेर टीका...


वेध माझा ऑनलाइन - राज्यातील शिंदे-  फडणवीस सरकार हे नियमबाह्य सरकार आहे त्याबाबतचा लढा कोर्टात सुरू आहे त्यामुळे त्यांच्यासमोरही अनेक प्रश्न आहेत त्यांच्यावर लटकती तलवार आहे आणि म्हणूनच या सरकारकडून राज्यात निवडणुका घेतल्या जात नाहीयेत लोकांमधून आपल्याला पाठिंबा मिळणार नाही अशी भीती त्यांना आहे त्यामुळेच कोर्टात जाऊन निवडणुका पुढे ढकलल्याची तारीख प्रत्येकवेळी ते घेत आहेत शिंदे गटातील अनेकजण अस्वस्थही असल्याचे विधान आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले रिसवड (ता- कराड) येथे विविध विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी  आले असता ते माध्यमांशी बोलत होते ...

ते म्हणाले  हसन मुश्रीफ यांच्यावर यापूर्वी इन्कमटेक्स ची रेड पडली होती आता त्यांच्या घर आणि ऑफिसवर इडी ची रेड टाकल्याचे कळतंय उगाचच एखाद्याला टार्गेट करून समाजातून उठवायच काम हे लोक करत आहेत त्याला कायदेशीर उत्तर मुश्रीफ देतील मात्र यापूर्वी संजय राऊत असतील देशमुख असतील यांच्याबाबतीत हेच झालं  राज्यातील याबाबत काम करणाऱ्या यंत्रणा केंद्र आणि राज्याच्या सांगण्यावरून काम करत आहेत हे लोकशाहीला घातक आहे असे यापूर्वी कधीही होत नव्हतं असेही आ पाटील यानी यावेळी नमूद केले
काही महापालिकामध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी हे सरकार आग्रही आहे स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही त्या त्या ठिकाणच्या सदस्य संख्येच्या टक्केवारीवर अवलंबून असते मात्र आम्ही लोकांसाठी काहीतरी करतोय हे प्रलोभन दाखवण्याचा त्यामागील हेतु असल्यामुळे स्वीकृत संख्या वाढवण्याचे सरकारचे प्रयोजन दिसते असा आरोपही आ पाटील यांनी यावेळी केला 
राज्यतील शिंदे -फडणवीस सरकारवर आ पाटील यांनी हल्ला चढवत या सरकारच्या एकूणच कार्यपद्धतीची चांगलीच चिरफाड केली यावेळी केलेल्या भाषणात भाजप नेत्यांनी छत्रपती शिवराय व संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला तसेच नामदार चंद्रकांत पाटील यांनी "भीक' हा शब्दप्रयोग करत महापुरुषांबद्दल केलेल्या विधानाचाही आमदार पाटील यांनी यावेळी समाचार घेतला हे  सरकार नियमबाह्य असल्याचेही माध्यमांशी बोलताना ते म्हणाले

No comments:

Post a Comment