वेध माझा ऑनलाइन - मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत असताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत मुंडे यांनीच माहिती दिली.
दरम्यान या अपघातानंतर आता मुंडे यांना खबरदारी म्हणून उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. थोड्याच वेळात मुंडे यांना परळी वरून लातूर मार्गे विमानाने मुंबईला उपचारासाठी नेलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
No comments:
Post a Comment