वेध माझा ऑनलाईन - महापालिकेत महाविकास आघाडीतील घटकपक्षांपैकी शिवसेनेचे वर्चस्व आहे. आणि मुंबईत सेनेची मोठी ताकद असल्याचे देखील मानले जाते. आम्हाला त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे. अशी इच्छा राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चालवत असताना सांगितलं होतं की तुम्ही आम्हालाही सोबत घ्या. आपण एकत्र मुंबईत काम करू. आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक संदेश देखील दिला. होता असेही यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.
राज्यातील राजकीय परिस्थिती गेल्या सहा महिन्यापासून बदलली आहे. वंचित बहुजन आघाडीची युती ही महापालिकेसाठी झाली आहे. असे आम्हाला समजले आहे. त्यांची युती कशा पध्दतीने पुढे जाणार हे पाहता येईल. मी आज या विषयावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहे. असेही यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन पक्ष आहेत. शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस. या तीन्ही पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आमचं ठरलं होतं की, जागा वाटप हे तीन पक्षांमध्ये होईल. त्या जागांमधून मित्रपक्षांसाठी जागा सोडायच्या. म्हणजे प्रत्येकाने आपल्या पक्षातून.असा ठराव झाला होता. मात्र हा ठराव विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी झाला होता. महापालिका निवडणुकांसदर्भात आमची अजून तरी चर्चा झाली नाही. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय बाकी आहे. असे अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची आहे. आज आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.तसच प्रकाश आंबेडकर यांच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये त्यांचं काय ठरलं आहे? जागावाटपावरून काय ठरलं आहे? यावर आम्ही चर्चा करणार आहोत असंही यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले...
No comments:
Post a Comment