Monday, January 23, 2023

साताऱ्यात कोयता घेऊन दहशत माजवणार्यांना पोलिसांनी धो-धो- धोपटले...

वेध माझा ऑनलाईन- पुणे जिल्ह्यातील काेयता गॅंगचे अनुकरण साता-यातील युवक करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाेवई नाका येथे काेयता घेऊन दहशत पसरविणा-या युवकांना सातारा पाेलिसांनी चांगलाच चोप देत ताब्यात घेतले आहे.

साताऱ्यात कोयते नाचवत भीतीचे वातावरण दहा ते पंधरा युवक तयार करीत हाेते. एका चारचाकीची तोडफोड करून एका नागरिकाच्या गळ्याला कोयता लावून मारण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांपर्यंत  पाेहचली. 
पोलिसांनी तातडीने माहितीच्या आधारे पाेवई नाका परिसर गाठला. तेथे पळून जाणा-या युवकांना ताब्यात घेतले. घटनास्थळी युवकांची आणि पाेलिसांची झटापट झाली. त्यावेळी पाेलिसांनी युवकांना चाेप दिला. पाच युवकांना ताब्यात घेतले असून त्यांची चाैकशी सुरु आहे.

No comments:

Post a Comment