Monday, January 23, 2023

आईचा तेरावा झाला... आणि दुसऱ्याच दिवशी केली आत्महत्या ; कराडच्या सोमवार पेठेतील घटना ;

वेध माझा ऑनलाईन - आईच्या निधनानंतर तेराव्या विधी नंतर दुसऱ्या दिवशी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार पेठेत शनिवार दि. 21 रोजी ही घटना घडली. अजित प्रभाकर करंदीकर (वय- 34) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, कराड मधील एक नामांकित बॅंकेत अजित हा पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. तो सोमवार पेठेत 2000 प्लाझा येथे आपला मोठा भाऊ व आई समवेत राहत होता. वयोमानामुळे आईचे निधन झाले होते. अजित व त्याचा भावाने सर्व विधी सोपस्कर पार करीत तेरावा ही घातला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार (दि. 21) जानेवारी दुपारनंतर अजितने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला या प्रकाराची माहिती मिळाल्या नंतर त्याने याबाबत पोलिसात खबर दिली. अजितने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. पुढील तपास कराड शहर पोलिस करीत आहेत.


No comments:

Post a Comment