वेध माझा ऑनलाईन - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या म्हणजेच 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होईल, असं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले आहेत. दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळं ठरलं आहे, असं सुभाष देसाई म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
दरम्यान शिवसेना-वंचित यांची युती कधी होणार? याबाबत प्रकाश आंबेडकर यांनाही विचारण्यात आलं. शिवसेना आणि आमच्यात युतीबाबत बोलणी झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका आहे. आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या चर्चा करत आहे. सर्वंनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे यांना वाटत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment