वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठांच्या वतीने हॅलो महाराष्ट्राचे सकलेन मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कराडचे तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार विजय माने संजय गांधी बबनराव तडवी डॉक्टर मनोज पाटील अरुण भिसे कादर नाईकवडी बी एम गायकवाड बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण लादे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड सचिव बुद्धभूषण गायकवाड सल्लागार राजेंद्र माने विद्या मोरे सुजाता वरे शंकरराव वीर प्रमोद काशीद सचिन कांबळे आनंदराव सव्वाखंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला..
परिवर्तन संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार हे समाजाला प्रेरणा देणारे आहेत असे मत विजय पवार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या मोरे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत आप्पासाहेब गायकवाड यांनी केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यास कराड शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment