Thursday, January 5, 2023

शंभूराज देसाई यांनी ठाकरेंचा विश्वासघात केला ; शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला ; शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा घणाघात ;

वेध माझा ऑनलाईन -  मंत्री शंभूराज देसाई कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीत तोंड उघडत नाहीत. त्याठिकाणी हिम्मत दाखवत नाहीत. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांनी लाल दिवा देऊन सन्मान केला, त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप करतात आज त्यांनी ठाकरे यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाटणची जनता वेळ आल्यावर त्यांचा हिशोब चुकता करेल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते, माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला

पाटण येथील श्रीमंत रणजीतसिंह पाटणकर स्मारक मंदिरात आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्यासह अनेक मान्यवर शिवसैनिकांची प्रमुख उपस्थिती होती

भास्कर जाधव म्हणाले, थोर महापुरुषांची बदनामी करून राज्यात सध्या राजकारण केले जात आहे भारतीय जनता पक्षाने लोकशाही व समाज व्यवस्था बिघडण्याची सुपारी घेतली आहे.सद्याच्या सरकारला सत्तेची मस्ती आलेली दिसते आहे  पाटणचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई मंत्रीपद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे ऋणातून मी कसा उतराई होऊ असे म्हणाले होते. आज मात्र त्यांनी ठाकरेंचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाटणची जनता योग्य वेळी त्यांचा हिशोब चुकता करेल असा विश्वास शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केला

No comments:

Post a Comment