Thursday, January 5, 2023

राऊतांचा जामीन रद्द होणार?

वेध माझा ऑनलाइन  -  पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात संजय राऊत हे तब्बल 100 दिवस तुरुंगात होते. संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. मात्र संजय राऊत यांच्या जामिनाला इडीकडून विरोध होत आहे. राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीच्या वतीनं न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज या याचिकेवर  सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता राऊतांचा जामीन कायम राहणार की रद्द होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

राऊत नाशिक दौऱ्यावर  
दरम्यान आज संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार. मात्र दुसरीकडे संजय राऊत हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आजपासून त्यांच्या नाशिक दौऱ्याला सुरुवात होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी राऊतांचा हा दौरा असल्यानं या दौऱ्याला विषेश महत्त्व प्राप्त झालं आहे.

राऊतांच्या दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठं खिंडार!
संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र संजय राऊत यांच्या दौऱ्याआधीच नाशिकमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांनी नाशिकचा दौरा केला होता. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावरून परतताच ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, आणि आता राऊत यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आल्यानं राऊतांचा हा दौरा देखील चर्चेत आला आहे.

No comments:

Post a Comment