वेध माझा ऑनलाइन - कराड येथील टिळक हायस्कूलचा शताब्दी महोत्सव आजपासून सुरू होत आहे. टिळक हायस्कूल च्या मैदानावर या महोत्सव काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली
ते म्हणाले, या महोत्सव काळात १६.जानेवारी २०२३ रोजी महोत्सवाचा शुभारंभ होत आहे. सकाळी १०:०० वाजता या महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री व उत्तर प्रदेश चे माजी राज्यपाल,मा.ना.श्री.राम नाईक. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील. शालेय शिक्षण, मराठी भाषा व पर्यावरण मंत्री ना.दीपक केसरकर. सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई. सातारा जिल्ह्याचे खासदार ना.श्रीनिवास पाटील. कराड दक्षिणचे आमदार.पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तरचे आमदार.बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
१७.०१.२०२३ रोजी टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘देश रंगीला’ हा कार्यक्रम, १८.०१.२०२३ रोजी आत्माराम विद्यामंदिरचा ‘अमृत महोत्सवी भारत’ व इंग्रजी माध्यमाची शाळेचा ‘इये मराठीचिये नगरी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. १९.०१.२०२३ रोजी महिला महाविद्यालयाचा ‘महाराष्ट्राची कला’ व स्व.रा.कि.लाहोटी कन्या प्रशालेचा ‘रंग महाराष्ट्राचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. २०.०१.२०२३ रोजी शिक्षण मंडळ कराड चे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. २१.०१.२०२३ रोजी शिक्षण मंडळाच्या गुणवान माजी विद्यार्थ्यांचा ‘मी असा घडलो’ हा मुलाखातीपर कार्यक्रम तसेच शिक्षण मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘कुर्यात सदा टिंगलंम’ हे नाटक सादर होणार आहे २२.०१.२०२३ रोजी शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांमधील माजी विद्यार्थी/ विद्यार्थिनी, माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा व सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचा ‘ज्ञानियांचे शिंपले - स्वरांचे मोती’ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या शताब्दी महोत्सवाच्या सर्व कार्यक्रमांना आजी माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी कराड व परिसरातील नागरिक, शिक्षणप्रेमी व पालकांना मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी,सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment