वेध माझा ऑनलाइन - यापुढे सातारा जिल्ह्यात माझे दौरे वारंवार होतील राजसाहेब इकडे येणारच आहेत या भागाला अधिक ताकद देऊ असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी काल कऱ्हाड (जि. सातारा) येथे दिले दरम्यान शिवसेना मनसे एकत्र येणार नाही. मुंबई महापालिकेत आमची कोणासोबत युती होईल का नाही हे माहित नाही. मात्र, मनसेनं स्वबळावर निवडणुकीसाठी तयारी केली आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.शिवसेना व मनसे एकत्र येणार का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र, त्यामध्ये सत्य नाही आणि ते शक्यही नाही, असंही त्यांनी यावेळी सांगून टाकले
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ठाकरे कऱ्हाड दौऱ्यावर होते. त्यादरम्यान विद्यानगर परिसरातील मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं. नंतर त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, धैर्यशील पाटील, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, राजेंद्र केंजळे, शहराध्यक्ष सागर बर्गे, तालुकाध्यक्ष दादा शिंगण, नितीन महाडिक आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, राजसाहेब ठाकरे यांच्या एवढा महाराष्ट्र फिरलेला नेता मी पाहिलेला नाही.
राजसाहेबांनी सांगितलं तर राजकारणात नक्की येईन. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघंही चांगलं काम करत आहेत. परंतु, राजसाहेब ठाकरे यांच्याकडं सत्ता दिल्यानंतर अधिक चांगलं काम होईल महापुरुषांची बदनामी करायची आणि विषय बदलायचा, असं सध्या राज्यात सुरु आहे हे मीडियावाल्यांनी दाखवणंच बंदच केलं पाहिजे, असही ठाकरे म्हणाले
No comments:
Post a Comment