वेध माझा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं वक्तव्य केलं होतं. याबाबत शरद पवार यांना विचारले असता पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली, आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहाणार नाही असं एकंदरीत चित्र दिसत असल्याचं म्हणत त्यांनी निवडणूक सर्व्हेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हटलं शरद पवार यांनी?
पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली आहेत आता हा विषय कशाला काढता अशी प्रतिक्रिया पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर दिली आहे मात्र या त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा अशी आता चर्चा सुरू आहे
दरम्यान बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत राहाणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. कर्नाटकात लोक परिवर्तनासाठी इच्छूक आहेत. विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मीही काहींशी बोललो आहे, महाविकास आघाडीने एकत्र निवडणुकीला सामोरे जावे अशी आमची भूमिका असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment