वेध माझा ऑनलाइन - पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली. शिवराज राक्षेने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. त्याला खांद्याची दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली होती. तो गतवेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण झाले.शिवराजला महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा आणि 5 लाख रूपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर शिवराजने महिंद्रा थार ही एसयुव्ही देखील पटकावली.
सेमी फायनलमध्ये माती विभागातून पै महेंद्र गायकवाड विरूध्द पै सिंकदर शेख यांच्यात कुस्ती झाली. ही कुस्ती पै महेंद्र गायकवाडने मारत थेट अंतिम सामन्यात धडक मारली, तर मॅट विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षे विरूद्ध हर्षवर्धन सदगीरला असा सामना झाला. हा सामना पै शिवराज राक्षेने 8-2 अशा एकतर्फी फरकाने जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली.
आणि महाराष्ट्र केसरीसाठी महेंद्र गायकवाड विरूद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये लढत झाली. दरम्यान या लढतीत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात चितपट करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला
No comments:
Post a Comment