वेध माझा ऑनलाइन - टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक म्हणजे 'बिग बॉस' होय. या शोला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत असते. शोमध्ये सतत होणारे वादविवाद, राडे, मैत्री, प्रेम या गोष्टी प्रेक्षकांना आकर्षित करुन घेत असतात. यंदा बिग बॉस मराठीचा चौथा सीजन सुरु झाला होता. बिग बॉसच्या या सीजनचा आज महाअंतिम सोहळा पार पडला आहे. या पर्वाचा विजेता कोण बनणार? बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हातात येणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले होते. आता अखेर बिग बॉसच्या विजेत्याचं नाव समोर आलं आहे.अक्षय केळकर अस या विजेत्यांच नाव आहे अक्षयने सर्वाधिक प्रेक्षकांचे प्रेम मिळवत विजेतेपदावर आपलं नाव कोरल आहे
आत्ताची breaking...
No comments:
Post a Comment