वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपरिषदेने चोवीस तास पाणी योजनेंतर्गत नागरिकांकडून दोन हजार पाचशे रुपयांचे शुल्क घेउन पाण्याची मीटर बसवली आहेत. मात्र चोवीस तास पाणी योजना अद्यापही चालू नाही, तरी ब-याच वर्षापासून सुरु असलेले दिवसातून दोन वेळा येत असलेले पाणी यावरही ( दर मंगळवारी व शनिवारी एक वेळ पाणी येत नाही). कराड
नगरपरिषदेने एप्रिल महिन्यापासून मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारली आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेली मीटर रीडिंगची आकारणी गैरवाजवी आहे. ती त्वरित रद्द करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गट यांच्याकडून करण्यात आल्याचे कराड शहर अध्यक्ष राजेंद्र माने यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे कॉन्ट्रॅक्टर व प्रशासनाच्या चुकीचे खापर कराड मधील नागरिकांवर फोडू नये. तसेच हा प्रकल्प अजून चालू नाही याला कोण जबाबदार? प्रकल्पाशी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काळया यादीत टाका व कराडकरांना न्याय द्या...असे या निवेदनात म्हटले आहे
No comments:
Post a Comment