Wednesday, January 25, 2023

थिएटरमध्ये घुसून चित्रपटाचे पोस्टर फाडले ; पठाण चित्रपटाला जोरदार विरोध

वेध माझा ऑनलाईन - सध्या 'पठाण' चित्रपट जोरात चर्चेत आहे. पण त्या सिनेमाच्या गाण्यांबद्दलचा वाढता वाद काही संपत नाहीये.या चित्रपटाला सातत्याने विरोध होत आहे, अशा परिस्थितीत चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या वादामुळे शाहरुखच्या फॅन फॉलोइंगवर फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही. तरीही काही ठिकाणी या चित्रपटाला विरोध केला जात आहे. धुळे शहरातील सिनेमागृहात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थेअटरमध्ये घुसून पोस्टर फाडले व पठाण सिनेमाविरुद्ध आंदोलन केले. 

शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही, धुळे शहरात बजरंग दल आणि हिंदुत्त्ववादी संघटनांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. बजरंग दलाने धुळे शहरातील मल्टिप्लेक्स आणि थिएटरमध्ये पठाण चित्रपट चालू न देण्याची धमकी दिली आहे शहरातील एका चित्रपटगृहात आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचा निषेध करत पोस्टर फाडले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. 

No comments:

Post a Comment