वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात दाखल झाले असून आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय बैठक पार पडत असून याला पवारांनी उपस्थिती लावली आहे.
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात नुकतीच व्यवस्थापकीय बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीस शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील, खा. श्रीनिवास पाटील, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर उपस्थित आहेत.संस्थेच्या मासिक आढावा बैठकीनंतर दुपारी 2 वाजता रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला पवार उपस्थिती लावणार आहेत.
No comments:
Post a Comment