वेध माझा ऑनलाइन - राजकारणातील 'चाणक्य' अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणासोबतच क्रिकेट विश्वातही तितकेच अॅक्टिव्ह दिसतात. आता आजोबांपाठोपाठ त्यांचा नातू म्हणजेच आमदार रोहित पवार यांची देखील क्रिकेटच्या मैदानात एंट्री झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीनंतर आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोशिएशनच्या कमिटीची बैठक पार पडली. यात रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी पवार यांनी युती केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनमध्ये रोहित पवारांची एंट्री झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि क्रिकेट हा इतिहास देशातील सर्वांनाच ज्ञात आहे. अशात आता त्यांचे नातू रोहित पवार हे देखील क्रिकेटच्या मैदानात आल्याने यांची अध्यक्षपदाची कारकीर्द कशी ठरते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
No comments:
Post a Comment