वेध माझा ऑनलाइन - सातारा शहरातील पोलिस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अश्लील चाळे करणाऱ्यांना तसेच कॅफे चालकाला नागरिकांनीच चांगलाच चोप दिला. यावेळी उपस्थित नागरिकांनी आक्रमक होत कॅफे बंद केला.वाईमधील अल्पवयीन युवतीवर कॅफेत बलात्काराची झाल्याची घटना ताजी असताना सातारा शहरात आता हा प्रकार समोर आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल जावू लागल आहे. पोलिस मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असे प्रकार घडत आहेत. परंतु त्यावर कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे
No comments:
Post a Comment