वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. अनेकदा तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली. शेवटी भगतसिंह कोश्यारी यांनीच केंद्र सरकारकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यास पुढील राज्यपाल कोण असतील? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
सुमित्रा महाजन यांचं नावही चर्चेत
दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावासोबत महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी आणखी एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे सुमित्रा महाजन यांचं. मात्र जरी या दोन नावाची चर्चा सुरू असली तरी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. या वक्तव्यांमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. शेवटी आता भगतसिंह कोश्यारी यांनीच आपल्या राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर नवे राज्यपाल म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव चर्चेमध्ये आहे.
कोण आहेत अमरिंदर सिंग?
कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते पंजाब काँग्रेसचे काही काळ प्रदेशाध्यक्षही होते. त्यांचे वडील हे पटियाला राजघराण्याचे शेवटचे राजे होते. 1963 ते 1966 या काळात अमरिंदर सिंग यांनी भारतीय लष्करातही आपलं योगदान दिलं आहे. ते 2014 ला काँग्रेसच्या तिकीटावर अमृतसर मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद व पक्षनेतृत्वाशी झालेल्या बेबनावामुळे अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबर 2021 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस 'पीएलसी' नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला
No comments:
Post a Comment